Shrigonda : जमीन बळकावल्याप्रकरणी तलाठ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी आणि कोरेगव्हाण येथील शेतजमीन बनावट व्यक्तीच्या साह्याने विकल्याप्रकरणी जगदीश लक्ष्मण सुपेकर वय 60 वर्ष धंदा शेती रा. पीएमसी कॉलनी नं.1। चाळनं.6.खोली नं.43, गोखले नगर रस्ता पुणे यांच्या फिर्यादीवरून तलाठ्यासह ५ जणांवर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काही नागरिक नोकरीकामी बाहेर राहत असल्यामुळे त्याचे गावाकडील शेतजमिनीकडे त्यांचे काहीसे दुर्लक्ष होते. अशाच लोकांना ही बनावट जमिनी विकणारी टोळी मोठ्या प्रमाणात टार्गेट करताना दिसत आहेत. असेच अनेक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडलेले आहेत. या प्रकरणी श्रीगोंदा तसेच बेलवंडी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दखलही आहेत. तरीही या लोकांना कोणताही फरक पडत नाही, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. असाच एक प्रकार पुन्हा एकदा श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे.

नोकरीकामी तालुक्यातील जगदीश लक्ष्मण सुपेकर वय 60 वर्ष धंदा शेती रा.पी एम सी कॉलनी नं.1। चाळ
नं. 6. खोली नं.43, गोखले नगर रस्ता पुणे या ठिकाणी राहण्यास आहेत त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी व कोरेगव्हाण या ठिकाणी आहे. मात्र, त्याचा जुना फोटो उपलब्ध करवून फिर्यादीच्या नावाचे खोटे अर्ज  प्रतिज्ञापत्र त्याचसोबत इतर बनावट कागदपत्रे तयार करून फिर्यादीचे मालकी हक्काच्या जमिनी पेको निम्मी जमीन बेकायदेशीरपणे गिळंकृत केली आहे.

ही बाब फिर्यादीच्या लक्षात आल्यावर त्यांनी याप्रकरणी साजेतील तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी फिर्यादीच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. त्यांनी याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात नामदेव सर्जेराव सुपेकर) स्वप्निल नामदेव सुपेकर सर्जेराव नामदेव विशाल नामदेव सुपेकर सर्व रा. सारोळा सोमवंशी ता.श्रीगोंदा जि अनगरभावसार रुपेश विष्णु रा.सारोळा सोमवंशी ता.श्रीगोंदाआण्णासाहेब लक्ष्मण बनकर रा.देवदैठण ता.श्रीगोंदा जि.अ.नगरयांच्यावर भादंवि ४२०, ४६५,४६७,४६८,४७१,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here