Shrigonda : पोलिसांनी शोधली गुन्हेगार जगताची पाळेमुळे

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्याची भौगोलिक रचना, शेजारील जिल्ह्यातील गुन्हेगारी, तालुक्यातील दाखल गुन्ह्याची पद्धत याचा अभ्यास करून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी गुन्हेगाराची पाळेमुळे शोधून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले अनेक फरारी जेरबंद करण्यात श्रीगोंदा पोलीस ठाणे अग्रेसर ठरले आहे.
मागील महिन्यात 12 दिवसांपूर्वी आढळगाव शिवारात मंगळसूत्र चोरी प्रकरणात खून, दरोडे, जबरी चोरी यासारख्या विविध आठ गंभीर गुन्ह्यांची श्रीगोंदा, जामखेड, कर्जत पोलीस स्टेशनमध्ये नोंद असणारा बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार ढोल्या उर्फ लखन नारायण भोसले रा वाहिरा, ता. आष्टी याला श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे.
त्याच्याकडून आढळगाव येथील चोरीतील 15 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र गुन्ह्यात वापरलेले कोयता, कटावणी आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कामगिरी ही पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, कर्जत पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस उप निरीक्षक अमित माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, संजय काळे, पोलीस गोकुळ इंगवले, पोलीस योगेश सुपेकर, नय्युम पठाण, वैभव गांगर्डे यांनी केली आहे.
दि 23 ऑगस्ट आढळगाव शिवारात रात्री साडेआठ वाजता हत्याचाराचा धाक दाखवून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले होते. ढोल्या उर्फ लखन याच्यावर 2014 पासून वरील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तपासात आणखी गुन्हे उघड होतील. असे दौलतराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here