विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांना कोरोनाची लागण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.  नाना पटोले यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

पाटोळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. या दरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली.

मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन.’

विधानसभेच्या अधिवेशनावर कोरोनाचे सावट

दरम्यान, विधानसभेचे पावसाळी अधिवेशन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असता विधानसभा अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे अधिवेशनावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. गर्दीत अधिवेशन घेण्याचे आव्हान आहे. यापूर्वी अधिवेशनाची तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता अधिवेशन 7 व 8 सप्टेंबरला होत असून कोरोनामुळे केवळ दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here