Sangamner : कोरोना बाधित रुग्णसंख्या @1895

0

काल रात्री उशिरा 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

प्रतिनिधी | विकास वाव्हळ | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरमध्ये कोरोना विषाणूनी अगदीच थैमान घातले असून काल रात्री उशिरा 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनास प्राप्त झाले हा सतत वाढत चाललेला रुग्ण वाढीचा आकडा पाहून संगमनेर शहर हादरले आहे.

संगमनेरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून नागरिक व प्रशासन देखील अस्वस्थ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी. असे प्रत्येक जण म्हणत असला, तरी संगमनेर शहरात नागरिकांचा वावर दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. दररोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत संगमनेरमधील व्यवहार चालू होते. ते आता सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येत असल्याने रुग्ण संख्येत वाढ होत आहे की काय असाही प्रश्न आता पुढे चर्चेला येत आहे. प्रशासनाने शिथिल केलेले निर्बंध संगमनेरकरां साठी मारक तर ठरत नाहीत ना ? असे मत ही काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

संगमनेरच्या कोरोना बधित रुग्ण संख्यात दररोज भर पडत असल्याने लवकरच ही द्विशतकापर्यंत पोहचेल असे चित्र आज दिसत आहे. आज बाधित रुग्ण सांख्य 1895 वर पोहचली आहे.

प्रशासनास काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या शासकीय व खासगी प्रयोग शाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतील अहवाला 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील माळीवाडा 45 व 18 वर्षीय महिला व 21 वर्षीय व 18 वर्षीय तरुण, जनतानगर 41 वर्षीय व्यक्ती, वाडेकर गल्ली 27 वर्षीय तरुण, गणेशनगर 75 व 60 वर्षीय महिला, साई श्रद्धा चौक 60 वर्षीय व्यक्ती, 44  व 42 वर्षीय तरुण, बाजारपेठ 31 वर्षीय तरुण, शिवाजीनगर 36 वर्षीय तरुण, मालदाड रोड परिसरातील 32 वर्षीय महिला, 24 व 36 वर्षीय तरुण, 09 वर्षीय बालिका व 58 वर्षीय महिला तर तालुक्यातील घुलेवाडी 50 व 47 वर्षीय व्यक्ती, 43 वर्षीय महिला व 10 वर्षीय बालिका, कौठे धांदरफळ 50 वर्षीय महिला व 50 वर्षीय व्यक्ती,

रायते 68, 45, 38, 35, 21 व 17 वर्षीय महिला, 40 वर्षीय तरुण व 06 वर्षीय बालिका, चिखली 70 वर्षीय व्यक्ती, कनोली 42 वर्षीय तरुण, चिंचपूर 57 वर्षीय व्यक्ती 24 वर्षीय तरुणी, वाघापूर 59 वर्षीय व्यक्ती, 27 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी व 10 वर्षीय बालक, चंदनापुरी 39 व 25 वर्षीय तरुण, समनापुर 39 वर्षीय तरुण, मंगळापुर 38 वर्षीय महिला,16 व 14 वर्षीय मुले,आंबीदुमाला 50 वर्षीय व्यक्ती, निमोण 90 वर्षीय व्यक्ती, 30 वर्षीय महिला, ढोलेवाडी 38 वर्षीय तरुण, चिकणी 58 वर्षीय व्यक्ती, 26 वर्षीय महिला, बोरबन 09 वर्षीय बालक,

कुरकुटवाडी 55, 48 व 43 वर्षीय महिला, 45 वर्षीय व्यक्ती, 28 व 26 वर्षीय तरुण, माळवाडी 74, 48,25 वर्षीय महिला, 52, 48 वर्षीय व्यक्ती, 28, 18 वर्षीय तरुण, 01 वर्षीय बालक व 03 वर्षीय बालिका, कोठे बुद्रुक 80, 35 वर्षीय महिला,17 वर्षीय तरुणी व 40 वर्षीय व्यक्ती, माळेगाव पठार 60 व 21 वर्षीय महिला, मनोली 70 वर्षीय व्यक्ती, 64 वर्षीय महिला, 35 वर्षीय तरूण व 13 वर्षीय बालक, तसेच कोल्हेवाडी 41 वर्षीय व्यक्ती व 37 वर्षीय तरुण, असे एकाच वेळी 80 रुग्णांची अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची बाधित रुग्णसंख्या एकोणाविसाव्या शतकाच्या जवळ पोहचली असून ती आता 1895 वर पोहोचली आहे.

हा वाढत चाललेला आकडा काळजीत भर टाकणारा आहे.त्यामुळे नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here