IPL : हरभजन सिंगची 13 व्या आयपीएलमधून माघार; 20 कोटी दिले तरी खेळणार नाही

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

यंदाच्या युएईमध्ये होत असलेल्या 13 व्या आयपीएलमधून हरभजन सिंग ने माघार घेतली आहे. यंदाच्या हंगामात तो खेळणार नाही. यासाठी कुटुंबाच्या काळजीपोटी माघार घेत आहोत असे स्पष्ट केले.

फिरकीपटू हरभजन सिंग हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. आयपीएल साठी सध्या संघ युएईला पोहोचलाय. चेन्नई संघात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. मात्र, संघात कोरोनाबाधित रुग्ण आहे म्हणून नाही तर कुटुंबाच्या काळजीपोटी मी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे, असे भज्जीने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच दोन कोटी काय 20 कोटी दिले तरी खेळणार नाही. पत्नी आणि तीन महिन्यांच्या मुलीसाठी हरभजनने हा निर्णय घेतल्याचे त्याच्या जवळच्या मित्राने सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here