BSNL च्या 20 हजार कर्मचा-यांवर नोकरी कपातीचे संकट, खर्चात काटकसर करण्याचे आदेश

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीएसएनएलच्या 20 हजार कर्मचा-यांवर नोकरी कपातीचे संकट ओढावले आहे. कोरोनामुळे कंपनी आर्थिक संकटात सापडली असून 20 हजार कंत्राटी कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएलच्या कर्मचारी युनियनने हा दावा केला आहे. 

बीएसएनएलच्या कर्मचारी युनियनने बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापक पीके पुरवार यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये गेल्या व्हीआरएस योजना अमलात आल्यानंतर देखील कर्मचा-यांचे पगार वेळेवर होत नाही. यामुळे 13 कंत्राटी कर्मचा-यांनी आत्महत्या केली.

दरम्यान, बीएसएनएलने सर्व मुख्य महाव्यवस्थापकांना कंत्राटी कर्माचा-यांवरील खर्च कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

3 COMMENTS

  1. Nice post. I was checking constantly this blog and I am impressed! Extremely helpful info particularly the last part 🙂 I care for such info much. I was seeking this certain information for a very long time. Thank you and good luck.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here