तिसर्‍यांदा सुशांतच्या घरी पोहोचली सीबीआयची टीम

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई ः दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरी पुन्हा एकदा सीबीआयची टीम दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास सीबीआयची दोन पथकं वांद्रे येथील कार्टर रोड येथील माऊंट ब्लॅक या इमारतीतील सुशांतच्या घरात पोहोचली आहेत.
सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, सुशांत राहात होता त्या इमारतीतील रहिवाशांची चौकशी होणार आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येचे पुन्हा एकदा नाट्य रुपांतर केलं जाईल, असंही सीबीआयच्या अधिकार्‍यांनी सांगितलं आहे. सुशांतच्या घरी सीबीआयच्या टीम तिसर्‍यांदा दाखल झाल्या आहेत. या आधी दोन वेळा सीबीआयच्या टीम सुशांतच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी सुशांतच्या इमारतीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरा कनेक्शनची तपासणी करण्यात आली होती. तसेच सुशांतच्या बेडरुममध्ये त्याच्या आत्महत्येचं नाट्य रुपांतरही करण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here