मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तुरूंगात जाण्यास तयार : आ. सरनाईक

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई ः बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावतला शिवसेना खा. संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणार्‍या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणार्‍या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे. असे ट्विट शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांनी केलं होतं.
या ट्विटला उत्तर देताना, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट करीत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
त्यानंतर पुऩ्हा एकदा आ. प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत, ‘मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही’, असं म्हटलं आहे. तसेच पुढे आमदार सरनाईक यांनी ‘भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे’, असा आरोप देखील केला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here