Shrirampur : गळनिंब येथे नदीपात्रात युवकाचा बुडून मृत्यू

 प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

तालुक्यातील गळनिंब येथील युवकाचा नदीपात्रात पाय घसरून पडून मुत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी श्रीरामपूर तालुक्यात घडली. राजेद्र काशिनाथ भोसले( वय३४) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र त्याची पत्नी व मुलगा, नदीपात्राकडे धुणे धुण्यासाठी गेले होते. धुणे धूऊन झाल्यानंतर राजेंद्र याने पत्नीला पुढे घरी पाठवले. पण मुलगा त्यांच्या बरोबरच नदीपात्राजवळ तेथेच उभा होता. त्यावेळी मयत भोसले हे नदीपात्रात पाय धुऊन घरी जाण्यासाठी निघणार त्यावेळीच नदीपात्रात पाय घसरला. यावेळी मुलाने वडील बुडाल्याचे पाहताच आरडाओरडा केला. आवाज ऐकूण गावामधील ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली होती. प्रवरा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह जास्त होता. नजीकच काही अंतरावर वेड्या बाभळीच्या झाडाला अडकला होता. तातडीने पोहणा-याच्या मदतीने मृत भोसले यांचा मृतदेह नदीबाहेर काढला होता. सध्या प्रवरानदी दुथडी भरून वाहत आहे.
नदीपात्रात युवक बुडाल्याची घटना गावभर पसरल्याने ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली होती. येथे गावकार्‍यांनी येथे मोठी गर्दी केली होती. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. लगेच घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस घटनास्थळी धाव घेतली. लोणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील शवविच्छेदनासाठी लोणी येथे पाठविण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here