Shrirampur : निपाणी वडगाव येथे वीज पडून ३ एकर ऊस जळून खाक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर तालुक्यातील बापूसाहेब चंद्रसेन भोसले यांचा ३ एकर ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना काल तीन वाजताच्या सुमारास निपाणी वाडगाव येथे घडली. भोसले यांचे शेतालगत इतर शेतकऱ्यांचा २५ ते ३० एकर ऊस होता. परंतु परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आल्यामुळे आग इतरत्रही पसरली नाही. याच भागातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आग विझविली म्हणून जादा हानी झाली नाही.
विशेष म्हणजे काल खोकर परिसरात प्रचंड पाऊस झाला. परंतु निपाणी वडगावमध्ये पाऊस अत्यंत कमी झाला. परंतु शेतकऱ्याचे वीज पडून ऊस पेटल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्याने शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. घटनेचा काल कामगार तलाठी यांचेमार्फत पंचनामा करण्यात आलेला आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here