Ahmadnagar Corona Updates : आज ६२२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यात २१ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन बरतले घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.१८ टक्के
आज ८९९ बाधितांची रुग्णसंख्येत भर
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६०६ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३४, अँटीजेन चाचणीत ३८० आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८५ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५३,  संगमनेर ९६, पाथर्डी ०४, श्रीगोंदा २०, अकोले  ०३, राहुरी २२, शेवगाव ०१, कोपरगाव १०, जामखेड ०४, मिलिटरी हॉस्पिटल २० आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३८० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ६१  संगमनेर १४, राहाता ४२ , पाथर्डी ३३, नगर ग्रामीण ०६,  श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ०७,  नेवासा ३९, श्रीगोंदा २६, पारनेर १७, अकोले २४, राहुरी १८, शेवगाव ११, कोपरगाव ३३, जामखेड १८ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३९, संगमनेर ११, राहाता १८, पाथर्डी ०६,  नगर ग्रामीण ३७, श्रीरामपूर १०,  कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा ०९, श्रीगोंदा ०३,  पारनेर ०९, अकोले ०७, राहुरी १४, शेवगाव ०५,  कोपरगांव ०५, जामखेड ०३ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ६२२ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १७८ संगमनेर ७७ राहाता ३६, पाथर्डी ३१, नगर ग्रा.३१, श्रीरामपूर ३७, कॅंटोन्मेंट ०५,  नेवासा १९, श्रीगोंदा ३७, पारनेर १९, अकोले २९, राहुरी २१, शेवगाव ०३,  कोपरगाव ५०, जामखेड ३२ कर्जत १४, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: २११३२*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३६०६*
*मृत्यू:३६४*
*एकूण रूग्ण संख्या:२५१०२*

3 COMMENTS

  1. This is the fitting blog for anyone who needs to find out about this topic. You understand a lot its nearly hard to argue with you (not that I truly would want…HaHa). You positively put a brand new spin on a subject thats been written about for years. Great stuff, just nice!

  2. You actually make it seem really easy with your presentation however I find this topic to be actually something which I think I might never understand. It kind of feels too complex and extremely wide for me. I am having a look forward on your next submit, I’ll attempt to get the hang of it!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here