Aurangabad : या कामगार नेत्याच्या निधनाने कामगार वर्गावर दु:खाचा डोंगर कोसळला

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

औरंगाबाद : कष्टकरी आणि मजूरांसाठी वेळोवेळी लढा उभारणारे मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष कॉ.उद्धव भवलकर (वय ७४, रा. सीटू भवन, अजबनगर) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि.५) निधन झाले. कॉ. उद्धव भवलकर यांच्यावर जालना रोडवरील एका खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत होते. कॉ. भवलकर यांच्या निधनाचे वृत्त पसरताच कामगार वर्गावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.

कॉ.भवलकर यांच्या निधनाचे वृद्ध येताच सीटू भवन वरील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा अर्ध्यावर उतरविण्यात आला होता. कॉ. उद्धव भवलकर यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या लाखनगांव येथे झाला होता. कॉ. भवलकर यांचे वडील आशृबा भवलकर हे वारकरी संप्रदायाचे होते, कॉ. भवलकर हे अवघ्या ७ वर्षाचे असतांना त्यांच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले होते. त्यानंतर त्यांच्या आईने मोठ्या कष्ठाने त्यांना मोठे केले होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

कॉ.भवलकर यांनी बी.एस्सी पर्यंतचे शिक्षण आंबेजोगाई (पूर्वीचे मोमीनाबाद) येथे घेतले. त्यानंतर त्यांनी विद्यापीठातून एम.एस्सी (फिजीक्स) ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी आपले एलएलबी पूर्ण केले होते. माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) उभारणीत कॉ.भवलकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

कॉ.उध्दव भवलकर यांनी आयुष्यभर कामगारांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढा उभारला होता. विद्यार्थी आणि शेतकNयांचे कल्याण व्हावे यासाठी ते सदैव प्रयत्न करीत होते. वंâपनीतील कामगारांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी कॉ. भवलकर यांनी कोल्हार ग्रुप, बागला ग्रुप, जालना स्टील, बीकेटी टायर, ग्रीव्हज, प्रिमीयम, एलजीडी आदीसह मराठवाड्यातील विविध नामांकीत वंâपन्यामध्ये सीटू च्या शाखा स्थापन करून कामगारांना न्याय मिळवून दिला. कॉ. भवलकर यांच्या पश्चात पत्नी रेखा भवलकर, एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here