Indian Railway: 12 सप्टेंबरपासून आणखी 80 स्पेशल ट्रेन सुरू होणार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

भारतीय रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 नव्या स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकिट बुकिंगची सुरुवात 10 सप्टेंबरपासून होणार आहे. (Indian Railway annouce special trains). रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी आज (5 सप्टेंबर) ही माहिती दिली.

विनोद कुमार म्हणाले, “भारतीय रेल्वे विभागाने 12 सप्टेंबरपासून 80 ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 10 सप्टेंबरपासून तिकिट बूक करता येणार आहे. या 80 स्पेशल ट्रेन आधी सुरु असलेल्या 230 ट्रेनच्या व्यतिरिक्त चालवलं जाणार आहे. राज्यांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार रेल्वे गाड्या सुरु केल्या जातील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here