Shrirampur : माजी आमदार भाऊसाहेब कांबळे कोरोना बाधित

  0

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना मागील काही दिवसांपासून त्रास होत असल्याने त्यांनी रॅपीड तपासणी केली. त्यात त्यांचा रिपार्ट कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला असल्याची स्थानिक प्रशासनाकडून माहिती मिळाली. सध्या त्यांच्यावर संत लूक हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच स्थानिक डाॅक्टाराकडून औषधउपचार घेतला होता.

  आरोग्य विभागाने कांबळे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा मंदा कांबळे यांचीही कोरोना तपासणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे समजते खबरदारीचा उपाय म्हणून माजी आमदार कांबळे यांची चिरंजीव नगरसेवक संतोष कांबळे यांची ही तपासणी केली असता ते इतर सर्वच जण निगेटिव्ह आले आहेत. येथील संत लूक रुग्णालयात सध्या अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here