कंगनाची पाठराखण करण्यासाठी दिया मिर्जा सरसावली, संजय राऊतांना म्हणाली माफी मागा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यामध्ये ट्विटरवरून घमासान युद्ध सुरू आहे. कंगनाने मुंबई पोलिसांवर निशाणा साधला. त्यानंतर मुंबई असुरक्षित वाटत असून मुंबई म्हणजे पाकव्याप्त काश्मीर वाटत आहे. असे म्हणाली होती. यावरून कंगनावर सर्वच कलाकारांकडून आगपखड झाली आणि शिवसेनेसोबत ट्विटरवर घमासान युद्ध छेडल गेलय. यात आता दिया मिर्झा हिने कंगनाची पाठराखण करीत खासदार संजय राऊतांना ‘हरामखोर’ या शब्दासाठी माफी मागायला सांगितले आहे.  

संजय राऊत यांनी कंगनाच्या ट्विटवर सुरुवातीला कठोर शब्दांत रिप्लाय दिला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी कंगनाला हरामखोर मुलगी म्हणून संबोधले. यावरून दिया मिर्झा भडकली. तिने हरामखोर या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तिने तुम्ही ट्विटरवरून टीका करा मात्र हरामखोर हा शब्द योग्य नाही. त्यासाठी खासदार राऊत यांनी माफी मागावी असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here