Shrigonda : युवक काँग्रेस आढावा बैठक उत्साहात

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा शहर व तालुका युवक काँग्रेस ची आढावा बैठक शहरातील तुलसीदास मंगल कर्यालय येथे पार पडली. 

यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रशांत ओगले युवक काँग्रेसचे समन्वयक राहुल उगले, मा. उपनगराध्यक्ष राजू गोरे, नगरसेवक संतोष कोथांबिरे, युवकचे तालुका अध्यक्ष गोरख बायकर, युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष हसन पटेल, युवक शहराध्यक्ष योगेश म्हेत्रे तसेच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, युवकचे राष्ट्रीय सचिव हेमंत तात्या ओगले, जि.प. सदस्या अनुराधा नागवडे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
आगामी काळात पक्षाची रणनीती व संघटना बांधणी वर चर्चा झाली. येणाऱ्या काळात युवकची मोट जिल्हा परिषद व पंचायत समिती गट वाईज नियुक्त्या करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे प्रशांत ओगले म्हणाले, बैठक उत्साहात पार पडली. तसेच युवक कॉंग्रेसची गाव तिथे शाखा करायच्या, असे राहुल उगले यांनी सांगितले. आभार हसन पटेल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here