Ahmadnagar Corona Updates : आज ६३८ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

आतापर्यंत २१ हजार ७७० रुग्ण बरे होऊन परतले घरी
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्के
आज नव्या ५११ बाधितांची रुग्णसंख्येत भर
अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५११ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३४७२ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५७, अँटीजेन चाचणीत २५७ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४१,  संगमनेर ०१, राहाता ०१,  पाथर्डी ११, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा ०६, श्रीगोंदा ०३, पारनेर ०३, अकोले  १७, शेवगाव ५१, कोपरगाव ०१, जामखेड ०२, कर्जत ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २५७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ६८, राहाता १४ , नगर ग्रामीण २४,  श्रीगोंदा १८, पारनेर १७, अकोले ०५, राहुरी १५, शेवगाव २३, कोपरगाव ३५, जामखेड १७ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ९७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३२, संगमनेर २०, राहाता ०५, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपुर १८, नेवासा ०३, श्रीगोंदा ०१,  पारनेर ०२, अकोले ०४, राहुरी ०१, शेवगाव ०१,  कोपरगांव ०३, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ६३८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०५ संगमनेर ४२ राहाता ३२, पाथर्डी १२, नगर ग्रा.४२, श्रीरामपूर ४३, कॅंटोन्मेंट १०,  नेवासा ५३, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले १३, राहुरी २१, शेवगाव ३८,  कोपरगाव ५३, जामखेड ०८, कर्जत १५, मिलिटरी हॉस्पिटल १८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: २१७१०*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३४७२*
*मृत्यू: ३७१*
*एकूण रूग्ण संख्या:२५६१३*

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here