कंगना विरुद्ध राऊत वादात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची उडी, राऊत यांनी माफी मागावी

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कंगना विरुद्ध राऊत हा वाद आदा शिगेला पोहोचलाय. या वादात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसांईंनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी खासदार राऊत यांनी कंगना राणावत यांना वापरलेल्या अपशब्दाबद्दल माफी मागावी, असे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

‘कंगना राणावत यांनी मुंबई सुरक्षेबाबत ट्विट केले होते. त्यांना अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्या व्यक्त झाल्या. मात्र, त्यानंतर त्यांना विरोध सुरू झाला. कंगना राणावत यांचे ट्विट चुकीचे होते, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे,’ असे सांगून देसाई पुढे म्हणाल्या, ‘परंतु वारंवार सत्ताधारी पक्ष म्हणजे शिवसेना आमदार त्यांना (कंगना राणावत) रणरागिणींच्या माध्यमातून थोबाड फोडू, अशा धमक्या देतात.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत यांच्याविषयी अपशब्द वापरले आणि माफी मागयाला ते तयार नाहीत. तरी तातडीने संजय राऊत यांनी कंगना राणावत यांची माफी मागितली पाहिजे. कारण अशा पद्धतीचे शब्द वापरणे म्हणजे महिला सन्मानावर आघात करण्यासारखेच आहे. ज्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान केला जातो, तेथे अशा पद्धतीने एका खासदाराने वक्तव्य करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे,’ असेही देसाई यांनी स्पष्ट केले. ‘संजय राऊत यांनी पुढे येऊन मोठ्या मनाने कंगना राणावत यांची माफी मागितली पाहिजे. अन्यथा केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊत यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे,’ अशी मागणीही त्यांनी केली.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here