ग्राहकांसाठी खूशखबर : आईडिया व्होडाफोनचा 2 GB च्या किमतीत 4 जीबीचा डेटा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आईडिया व्होडाफोन डेटा ग्राहकांसाठी खूशखबर आहे. कारण आईडिया आणि व्होडाफोनने जबरदस्त प्लान लाँच केला आहे. 2 जीबीच्या किमतीत 4 जीबी डेटा देणार आहे.  

२९९ रुपयांचा प्लान
वोडाफोन-आइडियाच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. रोज ४ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटाचा वापर करता येतो. तसेच याशिवाय रोज १०० एसएमए आणि वोडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

४४९ रुपयांचा प्लान
हा २९९ रुपयांचा प्लान आहे. यात दुप्पट वैधता मिळते. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. रोज ४ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे युजर्संना एकूण २२४ जीबी डेटाचा वापर करू शकतात. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग,रोज १०० एसएमएस आमि वोडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

६९९ रुपयांचा प्लान

वोडाफोन-आयडियाचा ६९९ रुपयांचा प्लानमध्ये युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड क़ॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. रोज ४ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना एकूण ३३६ जीबी डेटाचा वापर केला जातो. याशिवाय रोज १०० एसएमएस आणि वोडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here