मोठी बातमी : राजस्थानच्या चंबळ नदीत बोट बुडाली, 5 जण ठार, 10 जण बेपत्ता

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राजस्थानच्या चंबळ नदीमध्ये 25 ते 30 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट पाण्यात बुडाली. ही दुर्दैवी घटना बुंदीच्या चंदा खूर्द येथून वाहणा-या चंबळ नदीत घडली. आतापर्यंत 5 जणांचा मृतदेह बाहेर काढला असला तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे चंबळची पाणी पातळी वाढली आहे. तर बोटीत क्षमतेपेक्षा जास्त जण बसल्याने हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्याला सुरुवात झाली. गोठला कलाच्याजवळ कमलेश्वर धाम जात असताना ही घटना झाली. यादरम्यान, अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. लोकसभा सचिवालयाने जिल्हा प्रशासनोसोबत संपर्क साधला असून कोटा येथून एनडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. बचावकार्य सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here