Newasa : पीडितेला आरोपींकडून फिर्याद मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी

सोनई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न???

सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिला आत्याचार गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादी मुलीला सोमवारी (दि.14) सोनई शनिशिंगणापूर रोड जगदंबा मंदिराजवळ फिरत असताना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकला.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सोनई येथील हलवाई गल्ली येथील फिर्यादी मुलीवर अत्याचार केल्याबद्दल सोनई पोलीस ठाण्यात ३७६/२,१, ३५४,३६३,३६६९ अ, ५०६ बाल लैंगिक अत्याचार कलम अधिनियम २०१२ कलम ४,६,८,१२,१७ व अन्वये गुन्हा दाखल झालेला असून यातील आरोपींना गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत सोनई पोलीस पकडू शकलेले नाही. किंवा आरोपींना पोलीस पाठीशी घालतात हे न उलगडणारे कोडेच आहे. यातील आरोपी हा फिर्यादी मुलीला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत असून फिर्यादी मुलगी प्रचंड दबावाखाली आहे. तिच्याकडून काही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण, अशी प्रतिक्रिया मुलीच्या घरच्या लोकांकडून व्यक्त होत आहे.

या गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत असून फिर्यादीस धमकावीत असताना सोनई पोलीस आरोपीला अभय का देत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य सोनईकरांना पडलाआहे. फिर्यादी सोनई पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती देण्यासाठी गेली असता हा तपास शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे, असे सांगण्यात आले. तेथे गेले असता सोनई पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हा घडला असल्याने त्यांच्याकडे तपास आहे, अशी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन आपली जबाबदारी झटकत असल्याने फिर्यादीचे कुटुंब प्रचंड तणावात आहेत. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल केली असून सोनई पोलिसांनी गु. र.नं.४२३/२०२० अन्वये भा.द.वि.कलम ५०४, ५०६ अदाखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तरी या संदर्भात पोलिस तपासात प्रगती नसून आठ दिवसापासून आरोपी मोकाट गावात फिरत असताना सोनई पोलिस अटक का करत नाहीत, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसळकर यांनी केला आहे. शनिशिंगणापूर पोलीस या बाबत अनभिज्ञ आहेत.

सायबर गुन्हा असल्याने तो तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आहे. तो शनिशिंगणापूर पोलिसस्टेशनचे निरीक्षक विलास भोये यांच्याकडे गेला आहे. याबाबत त्यांना संपर्क केला असता ते म्हणाले सायबर गुन्ह्याचा तपास मी करणार आहे. पण आरोपी ज्या पोलिस स्टेशन अंतर्गत येतात त्या सोनई पोलिस स्टेशनने त्यांना अटक करावी, असे बोलताना ते म्हणाले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here