shrigonda : उपनगराध्यक्ष पद निवडणूक : भाजपकडून नवीन चेह-यांना संधी देण्याची शक्यता

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा नगरपालिका उपनगराध्यक्ष पदासाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीत भाजपकडून जुने नगरसेवक वेटिंगवर तर नवीन चेहऱ्यांना उपनागराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे, अशी चर्चा सध्या रंगताना दिसत आहे.

श्रीगोंदा नगरपालिकेत उपनागराध्यक्ष अशोक खेंडके यांनी राजीनामा देऊन बराच कालावधी गेल्यानंतर अखेर उपनगराध्यक्ष निवडणूक होत असून या निवडणुकीत नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची संख्या 11 तर राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक संख्या 9 आणि स्वीकृत नगरसेवक 2 असे संख्या बळ आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचा उपनगराध्यक्ष होईल, असे दिसते.
उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संग्राम घोडके, रमेश लाढाणे, ज्योती खेडकर, मनिषा लांडे, दीपाली औटी, अनुभव पाहता शहाजी खेतमाळीस, किंवा वनिता क्षीरसागर यांची निवड होऊ शकते. पण एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार उद्या नगराध्यक्षा खुर्चीवर भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता मोठी आहे. जर तसे झाले तर आघाडीवर नाव ज्योती खेडकर, मनीषा लांडे, संग्राम घोडके, रमेश लाढाणे, याची वर्णी लागणार अशी खास सूत्रांची माहिती आहे. तर उपनगराध्यक्ष पदी निवड होण्याआधीच काहींना भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी फोन करून शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे, अशी माहिती समजते.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे नगरसेवक संख्या कमी असल्यामुळे ते या निवडणुकीत जास्त रस घेणार नाहीत त्याच्याकडे 5 वर्षांसाठी नगराध्यक्ष पद आहे. त्यामुळे एक कामकाजचा भाग म्हणून त्याच्याकडून कोणी तरी अर्ज दाखल करेल. पण शेवटी बहुमताच्या जोरावर भाजपाचाच उपनगराध्यक्ष होणार हे नक्की.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here