Shevgaon : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना निवेदन दिले आहे. केंद्र शासनाने अचानक कांद्याची निर्यात बंद केल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी कांदा निर्यात बंदीची शेतकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. चालू वर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड महाराष्ट्रात करण्यात आली. परंतु काढणीच्या वेळी अवकाळी पावसामुळे व वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यात कोरोनामुळे बाजारपेठ बंद, बाजार समित्या बंद, वाहतूक बंद, सलग सात ते आठ महिने लागलेल्या लॉकडाऊन मुळे शेतकरी कांदा, भुसार माल, फळपिके भाजीपाला, कोंबडी बाजार, बैल बाजार, शेळी बाजार, संपूर्णपणे बंद असल्याने व्यावसायिक व शेतीपूरक व्यवसाय पूर्णपणे लयास गेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या गरजेपोटी पाच ते सहा रुपये दराने कांदा विक्री केली आहे.
अतिशय कमी दराने व त्यामध्ये कांदा विक्री केलेला आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे कांदा सडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परंतु सध्या बाजारात थोड्याफार प्रमाणात कांद्याचे भाव 25 ते 30 रुपये दर झाला. अशातच केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा विश्वास घात केला आहे. तरी संपूर्ण कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्यात यावी व खालील उद्भवलेल्या शेतकरी समस्यांचे निराकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये कांद्याचे निर्यात बंदी तातडीने उठवावी
कांद्याचे बियाणे नियंत्रित दराने व गुणवत्तापूर्वक मिळावे.
सन 2019 20 सालातील ठिबक सिंचन अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे सन 2019 20 सालातील कांदा चाळीचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे. सन 2019 20 चापडगाव बोधेगाव कापूस व डाळिंब पिकाचे पिक विमा मंजूर करण्यात यावा सलग सात महिने बंद असलेला बैल, गाय, शेळी-मेंढी कोंबडी बाजार तातडीने सुरू करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवगावच्या तहसीलदार मॅडम अर्चना पागिरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगरे, प्रशांत भराट, अमोल देवढे,  नारायण पायघन दादासाहेब पाचरणे, धावणे अशोक भोसले मेजर,प्रवीण मस्के ,नाना कातकडे इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here