Shrigonda : कोरोना मृत रुग्णाला अग्निडाग देण्यासाठी जागा मिळेना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील एका नागरिकाला कोरोनाची लागण झालीय. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या मृत शरीराला अग्निडाग देण्यासाठी समशानभूमीत जागा शिल्लक नसल्याने मृताच्या नातेवाईकांनी तो मृतदेह आपल्या गावी नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे कोरोनाने मयत झालेल्या रुग्णाची हेळसांड होताना दिसत आहे, असे नागरिकांचे मत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील कर्जत सीमेलगत असणाऱ्या एका गावात एका नागरिकाला कोणाच्या तरी संपर्कात आल्यामुळे कोविड १९ म्हणजे कोरोनाची लागण झाली. त्यास श्रीगोंदा येथील जम्बो कोविड सेंटर पारगाव सुद्रिक या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचा मृतदेह पालिका कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून श्रीगोंदा शहरातील स्मशानभूमीत आणले.
मात्र, त्या ठिकाणी अगोदरच दोन मृतदेह अग्निडाग देण्यासाठी ताटकळत पडलेले दिसले मग नातेवाईकांच्या विनंतीवरून पालिका कर्मचाऱ्यांनी तो कोरोनासदृश मृतदेह गावी नेण्यास परवानगी दिली. मग नातेवाईक यांनी मिळून त्यांच्या मूळ गावी त्या मृत देहावर अंत्यसंस्कार केले. मात्र, अशा प्रकारे कोरोनासदृश्श रुग्णाचा अंत्यविधी गावात आणून केल्यामुळे गावात कोरोनाची दहशद वाढली आहे, असे सुजाण नागरिकांचे मत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here