Shrigonda : हेच खरे कर्मवीर आण्णांचे कोरोना योद्धे…!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – म्हणता म्हणता शेताच्या बांधावर व दाराच्या उंबर्‍यावर कोरोना पोहोचला. आपल्या परीचयाची, जवळची माणसे याने दगावली. युद्धाच्या धसक्यापेक्षा या कोरोना महामारीचा धसका मात्र अधिक आहे. आरोग्य आणि शिक्षण याबाबत मात्र अजूनही राज्यकर्त्यांची उदासीनताच दिसते आहे. मात्र, या काळातही तालुक्यातील मढेवडगाव या ठिकाणी एक शिक्षकातील अवलिया पाहण्यास मिळत आहे, असे पालक वर्गातून बोलले जात आहे.

कोरोनाच्या काळात प्रत्येक जण आपली जीवाची काळजी घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत पण एकीकडे स्वतःचा जीव धोक्यात घालून पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावणाऱ्या मौजे मढेवडगाव तालुका-श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेचे शिक्षक व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेचे शिक्षक यदलोड शंकर सिद्राम मूळ राहणार सगरोळी तालुका बिलोली जिल्हा  नांदेड हा अवलिया शिक्षक आज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी व पालकांशी संवाद साधून ऑनलाईन शिक्षणाचे महत्व पटवून सांगून रोजच्या रोज त्यांचा अभ्यास घेऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे.

याशिवाय शासनाने त्यांच्यावर कोविड १९ च्या जनजागृतीचे देखील अतिरिक्त काम सोपवले आहे. ते करून ज्ञानदान सुरु ठेवले आहे. तालुक्यातील राजकीय नेते इथं आलटून, पालटून राजकीय सत्ता उपभोगणारे राज्यकर्ते घरात बसले असताना अन कुटुंबातील व्यक्तीला देखील घरात प्रवेश देताना संशयी नजरेने पाहणारे आपण या शिक्षकांची शिक्षणाविषयीची व विद्यार्थ्यांविषयी असणारी तळमळ,अस्था,प्रेम व माया पाहून पालक वर्ग थक्क होताना दिसत आहेत. त्यामुळे यापूर्वी  गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुःगुरुर्देवो महेश्वरः ।गुरुःसाक्षात् परब्रह्मतस्मै श्रीगुरवे नम: ॥  या शब्दाचा प्रत्यय या शिक्षकाला पाहिल्यावर येताना दिसत आहे, असे पालक वर्गातून बोलले जात आहे. काही काळानंतर परिस्थिती नक्की बदलेल पण या काळात माझा विद्यार्थी मानसिक दृष्टया खचता कामा नये. त्याच बरोबर तो शैक्षणिक दृष्टया देखील मागे राहू नये यासाठी हा अवालिया शिक्षक झगडताना दिसत आहे.

वेळ जाईल, सगळं सुरळीत होईल स्वत:वर विश्वास ठेवत हीच सकारात्मक उर्जा घेऊन आमच्या गावातील जि.प व रयत शिक्षण संस्थेतील न्यू इंग्लिश स्कूलमधील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन, सुरक्षित अंतर ठेऊन कोविड सूचनेचे पालन करुन विद्यार्थ्यांना आरोग्य व आॅनलाईन शिक्षणाची रुपरेषा सांगत त्याच्यातील सकारात्मकता जीवंत ठेवण्याचे काम अहोरात्र करत आहेत. हे शिक्षक खर्‍या अर्थाने कर्मवीरांचे योद्धे आहेत, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here