Breaking news: बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल 30 सप्टेंबरला; आडवाणी, जोशी, भारतींसह सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश

  0

  प्रतिनिधी राष्ट्र सह्याद्री

  विवादित रचना असलेला बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी 30 सप्टेंबरला निर्णय होणार आहे. याप्रकरणी माजी पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, आदींसह सर्व 32 आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोन्ही पक्षांची एक सप्टेंबरला झाली आहे . सीबीआई ने विशेष न्यायालयासमोर 351 साक्षीदार व 600 दस्तावेज पुरावे सादर केले.

  काही दिवसांपूर्वी रामजन्मभूमीचा निकाल लागला. हा निकाल पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने रामलल्लाच्या बाजूने दिला . त्यानंतर सर्वांचे लक्ष या खटल्याकडे लागले होते.  30 सप्टेंबरपर्यंत निर्णय देण्याचे आदेश विशेष न्यायालयाला देण्यात आले होते.

  त्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत निर्णयाची सुनावणी होऊ शकते. दरम्यान या सुनावणी कडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे .

   

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here