Sangamner : कोरोना बाधित रुग्णसंख्येची वाटचाल 25 व्या शतकाच्या दिशेने…

1
आजची नवीन रुग्ण संख्या 82… तर मृतांची संख्या 32 वर पोहोचली

प्रतिनिधी | विकास वाव्हळ |राष्ट्र सह्याद्री

संगमनेरमध्ये कोरोना बाधित रुग्ण संख्या ही कधी, कमी तर कधी जास्त अशी दररोजच सापडत असल्याने संगमनेरकरांमध्ये अस्वस्थता जाणवत आहे. आज तर एकूण नवीन 82 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यात शहराची रुग्ण संख्या कमी आहे. परंतु ग्रामीण भागातील रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करणे गरजेचे झाले आहे.

संगमनेरच्या एकूण 2467 बाधित रुग्ण संख्येपैकी 2209 रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर 226 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे. त्यात शहरातील 35 रुग्णांचा समावेश आहे. तर आजपर्यंतची एकूण मृतांची संख्या 32 वर पोहोचली आहे. त्यात 12 जण हे संगमनेर शहरातील असून उर्वरित 20 जण हे ग्रामीण भागातील आहे.

आज शासकीय व खासगी प्रयोग शाळा व  रॅपिड अँटीजेन चाचणीतून प्राप्त 82 रुग्णात शहरातील फक्त 08 रुग्ण तर तालुक्यातील 74 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे बाधित रुग्णांचा एकूण आकडा 2467 वर जाऊन पोहोचला आहे.

आज प्राप्त अहवालात शहरातील गणेशनगर 40 वर्षीय महिला, मालदाड रोड 59 वर्षीय व्यक्ती,  34 वर्षीय तरुण व 24 वर्षीय तरुणी, पाबळे वस्ती 42 वर्षीय तरुण, स्वामी कॉलनी 52 वर्षीय महिला, जानकीनगर 60 वर्षीय महिला, संगमनेर 49 वर्षीय व कुरण रोड  40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

तालुक्यातील आश्वी खुर्द 40 वर्षीय तरुण, 31 वर्षीय महिला, शिबलापुर 15 वर्षीय तरुणी, निमोण 55 वर्षीय व्यक्ती, 49 व 38 वर्षीय महिला, 08 वर्षीय मुलगा, सोनेवाडी 63 वर्षीय व्यक्ती, 49 महिला, 24 वर्षीय तरुणी, शिरापूर  52 वर्षीय महिला, पेमगिरी 68 वर्षीय व्यक्ती, धांदरफळ खुर्द 59, 55, 50 महिला, 27 व 26 वर्षीय तरुणी,09 वर्षीय बालिका, सादतपुर 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी व 18 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक 43 वर्षीय व्यक्ती, वडगाव पान 36 वर्षीय महिला, 43 वर्षीय तरुण, निमगाव जाळी 62 वर्षीय व्यक्ती, आंबी दुमाला  60 वर्षीय व्यक्ती, पिंपरणे 70 वर्षीय महिला, घुलेवाडी 61,54 वर्षीय व्यक्ती, 25 वर्षीय तरुण, चंदनापुरी 21 वर्षीय तरुण, खळी 45 वर्षीय तरुण, 38 वर्षीय महिला,

निळवंडे 27 वर्षीय तरुण, प्रतापपुर 34 वर्षीय महिला, मुंजेवाडी 45 वर्षीय महिला, झोळे 27 व 29 वर्षीय तरुण, 49 महिला, 26 वर्षीय तरुण, साकूर 60 वर्षीय व्यक्ती, 40 वर्षीय व्यक्ती, 30 महिला, 28 व 23 वर्षीय तरुणी, 03 वर्षीय बालक, चिखली 23 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण, कासारा दुमाला 47 वर्षीय व्यक्ती, गुंजाळवाडी 70 व 50 वर्षीय व्यक्ती, 42 व्यक्ती, 27, 26 व 25 वर्षीय तरुण, 65, 46, 45 महिला, 32, 22 वर्षीय तरुणी,12 वर्षीय बालिका, जोर्वे 37 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरुण व 10 वर्षीय बालक, डिग्रस 28 वर्षीय तरुण, सावरगाव तळ 75 व 50 वर्षीय व्यक्ती,17 वर्षीय तरुण, 70 व 45 वर्षीय महिला, कौठे खुर्द 22 वर्षीय तरुणी व हिवरगाव पावसा 25 वर्षीय तरुण, असे एकूण 80 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने संगमनेर तालुक्याच्या रूग्णसंख्येने 24 वे शतक ओलांडीत 25 व्या शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू गेली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here