Newasa : कृषीदुतांचे शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन

 प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

तालुक्यातील सोनई येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत सोनई येथील कृषी महािद्यालयाच्या वतीने कृषिदूत महेश नामदेव दरंदले याने ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम दरम्यान शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, आधुनिक शेती, यात्रिक शेती याचबरोबर विविध प्रक्रिया उद्योग, पारंपारिक शेती व शेंद्रिय शेतीचे महत्व याबाबत माहिती दिली.   
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी हा उपक्रम ऑनलाइन पद्धतीने व शेतकऱ्यांचा शेतावर व निवासस्थानाजवळ शेतकऱ्यांच्या समवेत राबवत आहेत. या कार्यक्रमासाठी सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरी मोरे,प्रा.अनुप दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. कहांडळ तसेच इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here