Jamkhed : कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जामखेड – केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कांदा पिकावरील निर्यात बंदी तातडीने उठवावी यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जामखेडचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश दादा आजबे, ता उपाध्यक्ष निलेश रंधवे, स्वप्नील खाडे, शहर उपाध्यक्ष नितीन जगताप, सागर मोरे आदी सह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून ही बंदी न उठवल्यास खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here