Beed : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थांमध्ये ध्वजारोहण

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर 2020 रोजी संपूर्ण मराठवाडा विभागात साजरा करण्यात येणार आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था यांनी त्यांचे कार्यालयाचे ध्वजारोहण समारंभ सकाळी 8.30 पूर्वी किंवा 9.30 च्या नंतर आयोजित करावा. कोरोना विषाणूची पार्श्र्वभूमी लक्षात घेता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा संर्पूण कार्यक्रम हा सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून तसेच सर्वासाठी मास्क बंधनकाराक असून केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी वेळीवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून साजरा करावा असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सूचित केले आहे.
17 सप्टेंबर 2020 रोजी  सकाळी 8.15 वा.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धनंजय मुंडे मंत्री  यांच्या उपस्थितीत स्मृतिस्तंभ, प्रियदर्शनी उद्यान, राजीव गांधी  चौक, बीड येथे हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम व सकाळी 9 वाजता  मुख्य शासकीय समारंभ पोलीस मुख्यालय मैदान,बीड येथे ध्वाजारोहण होईल. तसेच सकाळी 7.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे मा.जिल्हाधिकारी महोदय बीड यांचे शुभहस्ते ध्वाजारोहण समारंभ अयोजित करण्यात आला तसेच आयोजीत करण्यात आलेला आहे.
मुख्य ध्वजारोहण समारंभास सर्व विभाग प्रमुख, जिल्हास्तरीय अधिकारी, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहावे. व समारंभाच्या वेळी राष्ट्रीय पोशाख परिधान करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here