Kada : गोपनीय विभागाचे प्रशांत क्षीरसागर यांचा सत्कार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
आष्टी पोलिस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलिस नाईक प्रशांत क्षीरसागर यांची नुकतीच प्रशासकीय बदली झाली आहे. त्याबद्दल पोलिस ठाण्यात त्यांचा शाल, श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.
आष्टी पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलिस नाईक तथा खो- खो खेळाचे प्रशिक्षक प्रशांत क्षीरसागर तसेच पोकाॅ. मनोज खंडागळे याांची देखील प्रशासकीय बदली झाली. पोलिस नाईक क्षीरसागर यांची नेकनूर पोलिस ठाण्यात तर खंडागळे यांची जिल्हा मुख्यालयात बदली झाली आहे. त्याबद्दल त्यांचा आष्टीचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब बडे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक संजय सोले, राजेंद्र जैन, वीज महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ उषा जगदाळे, वंदना पोकळे व इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. मागील सहा वर्षात पोलिस दलात कर्तव्य बजावत असताना, प्रशांत क्षीरसागर यांनी सुट्टीच्या कालावधीत असंख्य शालेय विद्यार्थ्यांना खो-खो खेळाचे विनामुलय प्रशिक्षण दिले. आष्टी तालुक्यात खो-खो खेळाची एक चळवळ त्यांनी निर्माण केली होती. त्याच प्रशिक्षणाच्या बळावर अनेक विद्यार्थ्यांनी देश व राज्य पातळीवर नावलौकिक मिळवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here