उर्मिलाला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटल्यानंतर कंगनाची सारवासारव, म्हणाली सनी लिओनला पाहा…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटल्यानंतर तिच्यावर झालेल्या टिकेला उत्तर देताना कंगना म्हणाली पॉर्नस्टार म्हणण्यात काही आक्षेपार्ह नाही. याचे उदाहरण देण्यासाठी तिने सनी लिओनकडे पाहा, असे म्हटले.

“सनी लिओनसारख्या व्यक्ती आमच्या रोल मॉडेल नसाव्यात, असे म्हणणाऱ्या नामांकित लेखकावर लिबरल ब्रिगेड सोशल मीडियावरुन तुटून पडली होती. सनीला इंडस्ट्री आणि संपूर्ण भारताने एक कलाकार म्हणून स्वीकारले आहे. अचानक बनावट फेमिनिस्ट्सनी (स्त्रीवादी) पॉर्न स्टारला आक्षेपार्ह मानले आहे” असे ट्वीट कंगनाने केले आहे.

वाचा उर्मिला काय म्हणाली होती,

उर्मिला मातोंडकर काय म्हणाल्या होत्या?

“संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची तिला (कंगना) कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे” अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी त्याआधी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत केली होती.

“क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है, अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण तिला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्याच पैशातून आहे. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.” असा टोला उर्मिला मातोंडकर यांनी लगावला होता.

ड्रग्जचे सेवन करणाऱ्या बॉलिवूडमधील कलाकारांची नावे जाहीर करण्याची मागणी उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाकडे केली होती. “नावे कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने प्रत्यक्षात पुढे यावे आणि त्या सर्वांचे नाव घेऊन इंडस्ट्रीला मदत करावी. चला त्यांची सफाई करुया. मी तुला थंब्ज अप देणारी पहिली व्यक्ती असेन मुली” असेही त्या म्हणाल्या होत्या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here