संजय राऊतांचा केंद्र सरकारवर संसदेत हल्लाबोल, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सरकारने विक्रीसाठी खूप काही उपलब्ध केलय..

  0

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

  केंद्र सरकारकडून काही केंद्रीय कंपन्या किंवा त्यातील हिस्सा विकण्याबाबतच्या हालचाली सुरु आहे. तसंच सहा कंपन्या बंद करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती देखील आहे. या सर्व प्रकरणांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारनं बाजारात विक्रीसाठी खूप काही उपलब्ध केलंय. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट देखील आणलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

  राज्यसभेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशाची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे. अशा स्थितीत देशाचा जीडीपी आणि रिझर्व्ह बँक कंगाल झाली आहे. त्यातच एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि बरंच काही सरकारनं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलं आहे. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टदेखील आणलं आहे, असं राऊत म्हणाले.

  सरकार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट खासगी कंपनीकडे देण्याचा विचार करत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जगातील सर्वात मोठं बंदर आहे. त्यातून भारत सरकारला 30 टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळतो. असं महत्त्वपूर्ण बंदर खासगी कंपनीच्या हाती देणं राष्ट्री सपत्तीचं मोठं नुकसान असल्याचंही राऊत म्हणाले.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here