Shrigonda : भानगावातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, पाच जण अटक, एक जण फरार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव शिवारात एका बंगल्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल चालणारा हारजितीचा जुगार खेळला जात असल्याची गुप्तमाहिती पोलिसांना मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी अचानक छापा टाकून ५ जुगाऱ्यासह हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भानगाव शिवारातील रामदास साबळे वस्तीवरील शेतामधील बंद बंगल्यामध्ये काही इसम तिरट नावाचा हारजितीचा खेळ खेळत असल्याची माहिती गुप्तमाहितीदाराकडून मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी एक पथक तयार करून अचानक गुरुवार दि. १७ रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास छापा मारला असता साबळे वस्तीवरील शेतामधील बंद बंगल्यामध्ये काही लोक गोल रिंगण करून आपल्या हातात पत्त्या खेळत असल्याचे पोलिसांना दिसले.

यावेळी जुगार अड्डा चालक सुरेश पंढरीनाथ गोरे याने पोलिसांना पाहून पळून गेला. तसेच इतर पाच जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून यामध्ये नाना बाबुराव गायकवाड, रा. काष्टी, राजेंद्र मारुती ससे रा. सावेडी, अहमदनगर, भारत शिवाजी सोनटक्के रा. चैतन्यनगर, बीड, संतोष ज्ञानदेव तोरडमल रा. भानगाव, सचिन मच्छिंद्र तोरडमल ता. भानगाव यांच्याकडून भारतीय चलनातील सुमारे १२०००/- रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पो. कॉ. संजय काळे यांच्या फिर्यादीवरून जुगार प्रतिबंध अधिनियम १२ अ व अधिनियम ४,५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत आहेत.

राजकीय वरदहस्तामुळेच आरोपी फरार

सदरील जुगार अड्ड्याचे चालक सुरेश पंढरीनाथ गोरे हे माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी सरपंच असल्याने राजकीय वरदहस्तामुळेच असे जुगार अड्डे चालत असून त्यामुळे अशा गुन्ह्यांना अभय मिळत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here