मोठी बातमी : भारताच्या 38 हजार चौरस किलोमीटर जमिनीवर चीनचा अनधिकृत कब्जा – राजनाथ सिंग

देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यास जवान सक्षम

चीनकडून सीमा भागात भारताच्या 38 हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अनधिकृत कब्जा करण्यात आला आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. 

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी भारत-चीन तणावाचे पडसाद संसदेत पाहायला मिळाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1963 च्या तथाकथित करारांतर्गत पाकिस्तानने पाकव्याप्त 5 हजार 180 चौरस किलोमीटर जमीन अवैधपणे चीनच्या ताब्यात दिली. तर अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागातील तब्बल 90 हजार चौरस किलोमीटर जमीनीवर चीनने आपला ताबा सांगितला आहे.

यावेळी पूर्व लडाखमध्ये आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करीत आहोत. सीमेवरील तणाव शांतता पूर्ण मार्गात सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, चीन औपचारिक सीमारेषा मान्य करायला तयार नाही. त्यामुळे तणाव वाढत आहे. चीनकडून शांतताकराराचं वारंवार उल्लंघन होत आहे. मात्र, आमचे जवान देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यात सक्षम आहेत, असा विश्वास दाखवत, आम्ही देशाची मान झुकू देणार नाही, अशी ग्वाही देखली राजनाथ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here