पोलीस भरतीत राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देणार – गृहमंत्री अनिल देशमुख

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

राज्यात होत असलेल्या मेगा पोलीस भरतीत 13 टक्के जागा बाजूला ठेवून ही बाब कायदेशीरित्या तपासून पोलीस भरतीत मराठा समाजाला न्याय देणार, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यावरून महाविकास आघाडी सरकारवर अनेक प्रकारची टीका होत आहे. न्यायालयात सरकार बाजू मांडण्यात कमी पडले, असे आरोप सरकारवर केले जात आहेत. संभाजीराजे यांच्यासह अनेक नेत्यांनी यामुळे मराठा समाज दुखावला गेल्याचे भाष्य केले आहे. अशा परिस्थितीत राज्यात मेगा पोलीस भरती होत आहे.

पोलीस खात्यातील 12 हजार 528 रिक्त जागा भरण्यात येत आहे. मात्र, यावेळी या जागा भरल्या तर आरक्षणाअभावी मराठा समाजावर अन्याय होईन. यावर अनेक मराठा नेत्यांनी 13 टक्के जागा राखीव ठेवून उर्वरित भरती करावी, अशी मागणी केली.

यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 13 टक्के जागा बाजूला ठेवून यातील कायदेशीर बाबी तपासून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार, असे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती होत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईन, असेही देशमुख म्हणाले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here