Rahuri : देवळाली येथे कोव्हिड केअर सेंटर सुरु

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अत्यंत कमी दरात उपचार मिळावे यासाठी देवळाली कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात आल्याची माहिती देवळाली प्रवरा नगर पालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली.

देवळाली प्रवरा नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन,  सत्यजित कदम फाऊंडेशन व स्थानिक डॉक्टर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 50 बेडचे कोव्हिड केअर सेंटरचा शुभारंभ भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मणराव सावजी यांच्या शुभाहस्ते  करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम हे होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड,प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग, संतोष लगड, रमेश पिंपळे, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,मुख्याधिकारी अजित निकत आदी उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी आभार मानले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here