Jamkhed : आमदार सुरेश धस यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजयुमोचे रास्तारोको

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

लोककल्याणासाठी व ऊसतोडणी मंजुरांसाठी संवैधानिक मार्गाने अहोरात्र झटणारे माजी महसूल मंत्री आमदार सुरेश धस यांना अटक केल्याच्या निषेधार्थ जामखेड येथील भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जामखेड येथील खर्डा चौकात टायर जाळून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 

यावेळी आमदार सुरेश धस साहेब जिंदाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला होता.
लोक कल्याणासाठी आणि ऊसतोड मजुरांसाठी संवैधानिक मार्गाने आणि शांततेने आंदोलन करणारे आमदार सुरेश धस यांना काल दुपारी आष्टी पोलिसांनी अटक केल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ जामखेड शहरातील खर्डा चौकात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने  रास्तारोको आंदोलन करत टायर पेटवून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी जामखेड भाजपा युवामोर्चा ता.अध्यक्ष  शरद कार्ले,भाजपा शहर युवामोर्या ता.अध्यक्ष आभिजित राजे राळेभात, गणेशशेठ डोंगरे, सुनिल जगताप, सनी सदाफुले,सूरज पवार, गोरख धनवट, भरत राळेभात ,जामखेड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here