Pathardi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने कासार पिंपळगाव येथे वृक्षारोपण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती, महात्मा गांधी जयंती व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त देशभर भाजपतर्फे १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला असून विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यात येत आहेत.
पाथर्डी व शेवगाव तालुका भाजपच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या मागदर्शनाखाली शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित आज दि. १७ सप्टेंबर रोजी कोरोना साथरोगाची खबरदारी घेत सोशल डिस्टन्स पाळून पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे भाजपाच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी राधाकिसन राजळे,तुषार तुपे,भाऊराव भगत,अमित भगत,अप्पासाहेब राजळे,नवनाथ राजळे,विलास भगत,अजय राजळे,संतोष शेळके,अभिजित राजळे,चैतन्य केळकर,प्रवीण तुपे,अतुल राजळे,प्रशांत राजळे,सतीश जगताप,काकासाहेब कांबळे,गोटीरांम तिजोरे,अमोल म्हस्के,आनंदा तिजोरे,अतुल देशमुख बाळू म्हस्के,रामेश्वर राजळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here