Akole : सेंट्रल बँकेच्या समशेरपूर शाखे विरोधातील उपोषण अखेर मागे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

समशेरपूर – अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील सेंट्रल बँकेच्या कर्मचारी व बँकेच्या कामकाजा संदर्भातील विविध मागण्यांसाठी सुरु केलेले उपोषण आज अखेर मागे घेतले. बँकेच्या समोर गेली दोन दिवसापासून बसलेले मुथाळणे येथील रहिवासी दत्तु सदगीर यांनी समशेरपूरचे, तलाठी जॉर्ज कांबळे, यांचे हस्ते पाणी व सरबत घेऊन उपोषणाची सांगता केली.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पोपट दराडे, बँकेचे शाखाव्यवस्थापक थेटे, पोलीस शिपाई सानप, प्रकाश सोनवणे, शिवाजी कदम आदी उपस्थित होते.

अकोले तालुक्यातील मुथाळणे येथील रहिवाशी गेली दोन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी समशेरपूरच्या सेंट्रल बँकेच्या शाखेसमोर उपोषणास बसले होते. सेंट्रल बँकेचे कर्मचारी तसेच बँकेच्या शाखेच्या संदर्भात त्यांच्या काही तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी कायदेशीर मार्गाने निवेदन देऊन उपोषण सुरू केले. दोन दिवस सुरु असलेल्या या उपोषणास काही मान्यवरांनी भेटी दिल्या.
सध्या कोरोना काळ असल्यामुळे उपोषणास मर्यादा होत्या. परंतु याही परीस्थितीत अंदोलन सुरुच होते. शेवटी आज दुपारनंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने समशेरपूर गावचे तलाठी जॉर्ज कांबळे, ज्येष्ट नेते पोपट दराडे, पञकार शांताराम दराडे यांनी शाखाव्यवस्थापक व उपोषणार्थी यांचेत मध्यस्थी करुन दत्तू सदगीर यांचे सर्व शंकांचे निरसन केले. तसेच शाखा व्यवस्थापकांचे हस्ते त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. यानंतर गेली दोन दिवसांपासून सुरु असलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले.