सुशांत सिंह राजपूतची हत्या की आत्महत्या, लवकरच खुलासा

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी लवकरच हत्या की आत्महत्या यावर खुलासा होईन. सुशांतच्या पोस्टमार्टम व विसेरा रिपोर्टसाठी सीबीआयने एम्सकडून  देखील अहवाल मागविला होता. लवकरच याप्रकरणी एम्सची बैठक होऊन त्यात पोस्टमार्टम अहवाल आणि विसेरा अहवाल देण्यात येणार आहे.

कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी गळफास बसल्याने सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. कलीना एफ़एसएल च्या विसेरा अहवालातही कोणत्याही प्रकारचे विष मिळालेले नाही. असा अहवाल होता. मात्र या अहवालात मृत्यूची वेळ देण्यात आली नव्हती. त्यामुळे या अहवालावर अनेकांनी प्रश्न उठवले.

सीबीआयकडे हे प्रकरण सोपविल्यानंतर सीबीआईने आणखी एक मत घेण्यासाठी एम्सकडून अहवाल मागविला होता. 20 सप्टेंबरला एम्सच्या मेडिकल बोर्डची बैठक होणार आहे. यामध्ये सीबीआईच्या सीएफएसएल फाइंडिंग आणि सीबीआईच्या एसआईटी तपासाच्या अहवालाची समीक्षा केली जाईन. त्याचबरोबर विसेरा अहवाल, पोस्टमार्टम अहवाल आणि आतापर्यंतच्या तपासाचा मेडिकल बोर्ड शेवटचे मत देईन. त्यानंतरच याप्रकरणाच्या पुढील तपासाची दिशा निर्देशित होईन.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here