Ahmadnagar : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदावर प्रा. शिवाजी काटे

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकरणीस प्रांताध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी मान्यता दिली. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सेक्रेटरी पदी शेवगाव येथील प्रा. शिवाजीराव काटे पाटील यांची निवड झाली. 

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे प्रा. काटे यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच, स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्यानंतरच्या काळात पण प्रत्येक क्षेत्रातील सर्वसामान्य व्यक्ती केंद्रस्थानी ठेवून कार्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विचारांचे काम करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांचे अभिनंदन शेवगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमोल फडके यांनी केले. त्यावेळी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बब्बूभाई शेख, सचिव शोएब पठाण, उपाध्यक्ष किशोर कापरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. शिवाजी काटे यांच्या निवडीबद्दल माजी प्राचार्य मोहनराव शेटे सर, सा खरा महाराष्ट्राचे मुख्य संपादक निजाम पटेल, कार्यकारी संपादक चंद्रशेखर शेटे पाटील यांच्यासह परिसरातील मित्र परिवार व हितचिंतक यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here