Aurangabad : पूर्ववैमनस्यातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या

0
पडेगाव पवार हाऊस जवळील घटना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

औरंगाबाद : जुन्या वादातून 23 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने अनेक ठिकाणी भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. तसेच नग्नावस्थेत मृतदेह झुडपात फेकून मारेकरी फरार झाले. ही घटना आज सकाळी पडेगाव येथील पवार हाऊस येथे समोर आली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस मारेक-यांचा शोध घेत आहे.

मोहम्मद अझहर मोहम्मद हनिफ वय-23 (रा.अन्सार कॉलोनी) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, पडेगाव पॉवर हाऊस जवळील मोकळ्या जागेत आज सकाळी काही नागरिक प्रात:विधीसाठी गेले असता नग्नावस्थेत एक तरुण जखमी अवस्थेत झुडपात पडलेला दिसला. ही माहिती नागरिकांनी नियंत्रण कक्षाला कळविली.
माहिती मिळताच तातडीने पोलीस उपआयुक्त निकेश खाटमोडे, साह्ययक आयुक्त डॉ.दिनेशकुमार कोल्हे, गुणाजी सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, छावणी पोलीस निरीक्षक मनोज पगारे फॉरेन्सिकचे पथक, डॉग स्कॉड, यांनी घटनस्थळी गाठले. तेथे मृतदेहाची पाहणी केली असता डोक्याच्या पाठीमागील भागात गंभीर जखमी, कंबरेत धारदार वस्तूने भोसकल्याचे व गुडघ्याला व हाता पायांना बेदम मारहाणीचे व्रण आढळून आले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलविले.या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला विचारपूस साठी ताब्यात घेतल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here