Jamkhed : कोरोना बाधित रुग्णांचा आकडा एक हजारांच्या पलीकडे; मृतांची संख्या 27

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
जामखेड शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता कहर सुरू असून शेजारच्या तालुक्यातील अनेक रूग्ण जामखेड येथे तपासणी करून घेतात. त्यामुळे तालुक्यातील संख्या हजारी पार झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे एकूण सत्तावीस मृत्यू झालेले आहेत. झपाटयाने वाढणारी रूग्ण संख्या विचारात घेता दोनशे रूग्णांची सोय होईल, अशी जागा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. जामखेड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांच्या संख्येने एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दि . १५ दुपारी दोन वाजेपर्यंत १०१४ एवढी मोठी संख्या तालुक्यातील झालेली आहे. व मृतांची संख्या ही २७ झालेली आहे.
जामखेड शहरात १६ , खर्डा तीन , राजुरी दोन , साकत दोन , खुरदैठण दोन , मोहरी एक , मतेवाडी एक असे सत्तावीस मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. सध्या आरोळे कोविड सेंटर मध्ये १५४ कोरोना पेशंट उपचार घेत असुन आतापर्यंत नऊशे पेक्षा जास्त रूग्ण बरे होऊन सोडण्यात आले आहेत. आरोळे कोविड सेंटरमधे १६५ रूग्णांची सोय होऊ शकते म्हणून प्रशासनाने ताबडतोब पुढची उपाययोजना म्हणून दोनशे रूग्णांची सोय होईल अशी जागा ताब्यात घेतली आहे. व सध्या तपासणी जास्त प्रमाणात होत असल्याने रूग्णांची संख्या वाढत आहे. यातच जामखेड हे मध्यवर्ती असल्याने शेजारी पाटोदा, आष्टी, भूम, परांडा येथिल रूग्ण मोठ्या प्रमाणात जामखेड शहरात तपासणी करण्यासाठी येतात व येथेच ॲडमिट होतात.

यामुळेही जामखेडची संख्या वाढत आहे. शेजारी तालुक्यातील अनेक रूग्ण ॲडमिट होण्याच्या उद्देशाने येतात तपासणी करून घेतात. तुमच्या तालुक्यात तपासणी करून घ्या, म्हटले असता अनेक वेळा भांडणाचेही प्रसंग उद्भवतात. पण दररोज अनेक पेशंट शेजारच्या तालुक्यातील निघत आहेत. यामुळे जामखेडची संख्या वाढत आहे. सध्या अनेक लोकांचे मत जामखेड शहर लॉकडाउन करावे, असे आहे. सध्या शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. लोकांची बेफिकिरी कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. लग्न, अंत्यविधी, वेगवेगळे समारंभ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. लोकांनी स्वतः आचारसंहिता पाळली तरच आपण कोरोनाला हरवू शकतो.

सध्या शेजारच्या तालुक्यातील पाटोदा, आष्टी, भूम, परांडा, करमाळा तालुक्यातील अनेक रूग्ण जामखेड शहरात चांगली सोय असल्याने जामखेड शहरात तपासणी साठी येतात व येथेच अॅडमिट होतात. यामुळे जामखेडची संख्या वाढू लागली आहे. तर प्रत्येक रूग्णाने आपापल्या तालुक्यात तपासणी करून घ्यावी. एखादा खूप सिरीयस असेल तर त्याची करायला हरकत नाही. परंतु रोजच बाहेरच्या तालुक्यातील लोक येऊन तपासण्या करत आहेत. त्यामुळे आपले मिळालेले एक हजार किट लगेच संपतील परत लवकर किट उपलब्ध होत होणार नाहीत.
  – संजय कोठारी – सामाजिक कार्यकर्ते,जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here