Shirurkasar : …गुरूजी खरचं सांगाना शाळा कधी सुरू होणार?

4
पाल्यांना वैतागलेल्या पालकांची शिक्षकांना आर्त हाक

प्रतिनिधी | जगन्नाथ परजणे | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनाच्या महासंकटात शाळा सुरु न झाल्यामुळे गेल्या साडेसहा महिन्यांपासून आपले पाल्य त्रास देत असल्यामुळे वैतागलेल्या पालकांनी गुरूजींना आर्त हाक देऊन विचारात आहेत खरचं सांगाना गुरूजी शाळा कधी सुरू होणार.
राज्यात जिल्हापरिषदेच्या, निमशासकीय शाळा आहेत. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व आजपर्यंत कळलेच नाही. लहानपणी पाल्य जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी गेले तर सांयकाळी येत होते. पालकांना त्यांचा त्रास जाणवत नव्हता. शाळेत जाऊन अनेक महाभाग शिक्षकांना दमदाटी करायचे फुकट पगार घेता काय? माझ्या मुलाला काहीच येईना त्याला
जर आले नाही तर बघून घेईन, वरिष्ठांकडे तक्रार करील. यासह अनेक वाईट भाषा गुरूजींना ऐकून घ्यावा लागल्या
आहेत. परंतु कोरोनाचे महामारी संकट मार्च महिन्यापासून आल्याने मुले घरीच आहेत.
एरव्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना घेऊन मामाच्या गावाला जाता येतं. किंवा पोहणे वा अन्य खेळ तसेच, चित्रकला, नृत्य-गायन असे क्लासेस लावून मुलांचा वेळ घालवता येतो. मात्र, यंदा कोरोनामुळे मुलांसह पालकही घरात डांबले गेले. तेव्हा मात्र आपल्याच मुलांना कसं सांभाळायचा असा मोठा प्रश्न पालकांना पडला. कारण मुलांचा स्वभावच मुळी चंचल आणि जिज्ञासू असतो. पण त्यांची ही जिज्ञासू वृत्ती किंबहूना चंचलपणा पालकांना व्यवस्थित सांभाळता येत नाही. परिणामी पालकांना हे सर्व त्रासदायक वाटते. तरी पालकांनी उन्हाळा कसाबसा काढला.
मात्र, उन्हाळा संपून पावसाळाही संपत आला तरी शाळा मात्र सुरू न झाल्याने. आता मात्र पालकांचा धीर सुटू लागला. मुलांना कसे सांभाळावे. आपलंच लेकरू आपल्यालाच त्रास देतयं हे कोणाला सांगावं? म्हणून गुरुजींना असंख्य पालक गेली साडेतीन महिन्यापासून सारखे फोन करीत आहेत. सरकारचं काहीच खरं नाही. गुरूजी तुम्हीच खरचं सांगाना शाळा कधी सुरू होणार, अशी विनवणी असंख्य पालक करत असल्याचे दिसून येत आहे.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here