Jamkhed : मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत सरकारी नोकरभरती करू नका…

सकल मराठा समाजाची आमदार रोहित पवार यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जामखेड – मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती घेण्यात येऊ नये. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकरभरती थांबविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना देण्यात आले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. याचे मराठा समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असून, त्या भावनेचा सरकारने आदर केला पाहिजे. अशा अडचणीच्या काळात शासनाने पोलीस भरतीचा निर्णय जाहीर करून मराठा समाजाला चिथावणी देण्याचा प्रकार केला आहे.

जे आरक्षण मिळाले होते, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत आणि जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून आरक्षण कायम होत नाही. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकरभरती काढू नये. सध्याच्या परिस्थितीत नोकरभरती केली, तर त्याविरोधात समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. आपण समाजाची भावना लक्षात घेऊन मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व शासकीय नोकर भरती थांबविण्यात यावी यायाबत आपण शासन दरबारी प्रयत्न करावेत या मागणीचे निवेदन आमदार रोहित पवार यांना देण्यात आले.

या निवेदनवर सकल मराठा समन्वयक मंगेश आजबे, दादाराजे भोसले, सचिन साळुंखे, कृष्णराजे चव्हाण, प्रदीप वाळुंजकर, लखन भुतकर, संतोष जाधव, शंकर जाधव, मंगेश मुळे, देवा मोरे,कृष्णा डुचे आदींच्या साह्य आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here