युती केली नसती तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो – फडणवीस

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

युती केली नसती तर विधानसभा निवडणुकीत 150 जागांच्या पुढे गेलो असतो, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. यावेळी आयोजित भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना फडणवीस यांनी हा दावा केला आहे. या रॅलीत भाऊ तोरसेकर हे प्रमुख वक्ते होते. तोरसेकर यांनी निवडणुकांपूर्वी केलेल्या राजकीय भाकीतांच्या आधारे फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.

“खरं म्हणजे एकच गोष्ट आपली चुकली. भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेच्या आधी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी भाजपला पर्याय दिले होते. भाजप 150+ किंवा युती 200+. त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय स्वीकारला नसता तर भाऊ तोरसेकर यांचं तिसरं भाकित देखील खरं ठरलं असतं,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

भाऊ तोरसेकर यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी भाजपने जर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे नेता म्हणून निवडले तर भाजपला 272+ जागा मिळतील. तर 2019 च्या निवडणुकीत एक दोन निवडणुका हरल्यानंतरही तोरसेकर यांनी भाजपला 300+ जागा मिळतील असे भाकीत केले होते. यावेळी अनेकांनी त्यावर शंका घेतल्या होत्या. मात्र, भाऊ तोरसेकर यांची दोन्हीही भाकितं खरी ठरली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here