Shirdi : लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने स्वतःला पेटवले

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शिर्डी येथे तरुणीने लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने स्वतःला पेटवून घेतले. ही धक्कादायक घटना गुरुवारी (दि.17) घडली. दरम्यान तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

सार्थक बनसोडे असे या तरुणाचे नाव आहे.

तरुणीने लग्नाला नकार दिल्याने सार्थक याने गुरुवारी दुपारी स्वतःला पेटवून घेतले. सार्थकला वाचविण्याच्या प्रयत्नात तरुणीचे वडील व तरुणी दोघेही जखमी झाले. दरम्यान त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here