Shrigonda : साईकृपा तंत्रनिकेतन येथे एक दिवसीय “मूलभूत रोबोटिक्स” विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
श्रीगोंदा: तालुक्यातील घारगाव येथील दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित साईकृपा तंत्रनिकेतन येथे “मूलभूत रोबोटिक्स” या विषयावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा “ गुगल मिट”च्या माध्यमातून विद्यार्थांसाठी आयोजित करण्यात आली होती.
सुनील पवळ, अटल तांत्रिक विभाग प्रमुख, शारदानगर हे कार्यशाळेस वक्ते म्हणून लाभले होते. विद्यार्थांना रोबोटिक्सविषयी सखोल माहिती व्हावी, नवीन तंत्रज्ञान आणि रोबोटिक्सच्या मूलभूत गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले. वाढती मागणी आणि त्याचे उत्पादन आणि सर्व प्रकारच्या उद्योगांमध्ये सेन्सरचा मोठ्या प्रमाणात वापर याबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक केले, तसेच विद्यार्थांच्या मनातील प्रश्नांचे अतिशय सोप्या भाषेत निरसन केले.
प्रशिक्षण कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री  दत्तात्रय पानसरे, सचिव सौ. अर्चना पानसरे, साईकृपा तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. दिनेश भदाणे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन अधिव्याख्याता श्री राहूल राठोड व श्री प्रतीश सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here