Beed : पिंपरगव्हाण रस्त्याचे थांबवलेले काम तात्काळ सुरू करा – जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

प्रभाग क्र.1 व 10 मधील पिंपरगव्हाण रोडवर चालू असलेल्या रस्त्याचे काम थांबवण्यात आले होते. त्यामुळे येथील नागरीक व नगरसेवक भास्करराव जाधव, किशोर पिंगळे, विकास जोगदंड, सुभाष सपकाळ, मुकूंद भालेकर, माणिक वाघमारे, शहाजी रणदिवे, मंगेश धोंगडे यांनी आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची भेट घेऊन झाला प्रकार निवेदन देऊन सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी हे काम उद्याच तात्काळ सुरू करा व अडथळा आणनार्‍यांवर गुन्हे दाखल करा असे आदेश दिले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून पिंपरगव्हाण रोडवर नगरपरिषद बीडच्या नगरोत्थान योजनेमार्फत टप्पा क्र.1 मधील सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले आहे मात्र काल आघाडीचे नगरसेवक रंजीत बनसोडे, प्रभाकर पोकळे, गणेश तांदळे, भैया मोरे यांनी सुडबुध्दीच्या राजकारणापोटी या भागातील विकास कामे होउ नयेत म्हणून कार्यकर्त्यांना घेऊन त्या ठिकाणी आले व तेथील काम करणारे कर्मचारी व अधिकारी यांना शिवीगाळ करत तेथून हाकलून दिले व गैरकायदेशीररित्या काम थांबवले होते त्यामुळे या भागातील नागरीकांनी संतापही व्यक्त केला.

सुरू असलेले काम थांबवल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये नागरिकांचे हाल होऊ नयेत व हे काम सुरू रहावे. यासाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सामंजस्याची भुमिका घेत काम सुरू केले होते. काम बंद पडल्यानंतर या भागातील नगरसेवकांसहीत 50 नागरीकांच्या सहीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. सुरू असलेले काम थांबवल्यामुळे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी तात्काळ मुख्याधिकारी डॉ.गुट्टे यांना फोन करून हे काम उद्याचे उद्याच सुरू करा, कामात व्यत्यय आणनार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा असे फर्मान सोडले त्यामुळे हे काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी नगरसेवक भास्करराव जाधव, किशोर पिंगळे, विकास जोगदंड, सुभाष सपकाळ, मुकूंद भालेकर, माणिक वाघमारे, शहाजी रणदिवे, मंगेश धोंगडे यांच्यासह नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here